प्रतिनिधी/ बेळगाव
भाग्यनगर येथील एसकेई सोसायटी संचालित व्ही. एम. शानभाग मराठी प्राथमिक शाळेतील पहिली व दुसरी वर्गाचा पालक मेळावा नुकताच के. एम. गिरी सभागृहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून तुषार कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी त्यांनी लहान मुले म्हणजे मातीचा गोळा असतो. आपण जसा त्याला आकार देऊ, तशी ती घडत असतात. त्यामुळे लहान वयातच मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत, असे सांगितले.
तानाजी पाटील यांनी परिचय करून दिला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन मेघना मांडेकर यांनी केले. जोतिबा कदम यांनी आभार मानले.









