सांगली: पटसंख्या असूनही शिक्षकाची कामगिरीवर दुसऱ्या शाळेत बदली केल्याने संतप्त झालेल्या पालकांनी शाळेलाच कुलूप ठोकल्याचा प्रकार जत तालुक्यातील गारळेवाडी नंबर दोन येथे घडला. तातडीने शिक्षक न दिल्यास शाळेसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
जत तालुक्यातील सोन्याळ येथील गारळेवाडी नं २ येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. पहिली ते चौथीची पटसंख्या २५ पेक्षा अधिक असताना कमी पट असल्याच्या कारणावरून पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळेतील एका शिक्षकाची शेजारी असलेल्या लकडेवाडीकडे कामगिरीवर बदली केली.
अचानक शिक्षकाची बदली केलेल्याने संत्पत झालेल्या पालकांनी सोमवारी शाळेला टाळे ठोकले, पंटसंख्या असताना तसेच नवीन मुले शाळेत प्रवेश घेत असताना चुकीच्या माहितीच्या आधारे आणि घाईगडबडीने शिक्षकाची बदली केल्याचा आरोप करीत शाळेसमोर निदर्शने केली.
हेही वाचा- घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद ; विटा पोलिसांची कारवाई
यावेळी ग्रामपंचायत सदस्य बजरंग गारळे, दगडु गारळे, गुंडा गारळे, वंदना गारळे पारूबाई शिंगाडे, रूपा गारळे, सुजाता गारळे, बिराप्पा गारळे, आक्काताई गारळे, सुभाष गारळे, शाराबाई गारळे उपस्थित होते.
हेही वाचा- आता मस्ती जिरली का? म्हणत शिवसेना माजी नागरसेविकेच्या पतीवर खुनी हल्ला, इस्लामपूरातील घटना
ग्रा.पं. सदस्य बजरंग गारळे म्हणाले. ग्रामिण भागामध्ये शिक्षणाच्या सोयीसुविधा झाल्याने जागृती झाली. कबाड कष्ट करून पालक मुलांना शाळेत घालत आहेत. असे असताना प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाची अचानक एकत्र बदली केली आहे. कोरोनामुळे शैक्षणिक कामकाजावर परिणाम झाला. शाळा बंद राहिल्या आता परिस्थिती पूर्व पदावर आली. नवीन वर्षापासून शाळेत पटसंख्या वाढत आहे सध्या 25 टक्के इतका पट आहे. आणखी काही जणांचा प्रवेश होणार आहे त्यामुळे दोन शिक्षकांची गरज आहे. बदली केलेल्या शिक्षकाची बदली तातडीने रद्द करून शिक्षक द्यावा अन्यथा शाळेसंबंधी उपोषण केला जाईल.
Previous Articleशित्तुर वारुण परिसरातील धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण
Next Article इतिहास राहिला पुस्तकात….








