आरोग्यदायी मातांच्या मुलींमध्ये नैराश्याचा धोका कमी
धकाधकीच्या जीवनात आरोग्यदायी राहणे अत्यंत आवश्यक आहे, कारण याचा प्रभाव तुमच्या मुलांच्या आरोग्यावरही पडतो. ज्या मातांचे राहणीमान आरोग्यदायी असते, त्यांच्या मुलींमध्ये नैराश्याची लक्षणे कमी असतात. परंतु मुलांवर अशाप्रकारचा कुठलाच प्रभाव पडत नाही.
मागील काही वर्षांमध्ये किशोरवयीनांमध्ये नैराश्य वेगाने वाढत ओ. अमेरिकेत 2005 मध्ये 8.7 टक्के किशोरवयीन नैराश्याने त्रस्त होते. हा आकडा 2014 मध्ये वाढून 11.3 टक्के झाला. तर 50 टक्के किशोरवयीनांनी नैराश्याच्या व्यतिरिक्त याच्याशी निगडित अन्य मानसिक आजारांनी ग्रस्त असल्याची बाब कबूल केली आहे. युवांमध्ये अपंगत्वाचे प्रमुख कारण देखील नैराश्य ठरत आहे.

सकस आहार, धूम्रपान न करणे, शारीरिक स्वरुपात सक्रीय राहणे, योग्य बॉढी मास इंडेक्स, आणि मद्यपान न केल्याने नैराश्यात घट होत असल्याचे प्रमुख संशोधक वी-चेन वांग यांनी स्वतःच्या संशोधनात नमूद केले आहे. या संशोधनात त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत 25-45 या वयोगटातील 10,368 महिलांचा डाटा एकत्र केला होता.
वडिलांच्या नैराश्याचा प्रभाव
1989 पासून जमविण्यात आलेल्या या डाटाच्या विश्लेषणातून मातांची जीवनशैली आणि वर्तन त्यांच्या अपत्याच्या जीवनशैलीशी थेटपणे जोडली गेलेली असल्याचे समोर आले. परंतु माता स्थुल असल्या तरीही मुलींमध्ये नैराश्याची शक्यता कमी असते. वडिलांच्या नैराश्याचा मुलांवर खोलवर परिणाम होत असतो. वडिल जर नैराश्यात असतील तर मुलांच्या विकासासाठी योग्य वातावरण मिळू शकत नाही.
पालकांच्या वर्तनाचे अनुकरण
मुले अजाणतेपणी पालकांच्या वर्तनाचे अनुकरण करत असते. अनेकदा हे वर्तन ते आत्मसातही करत असतात. तसेच कित्येकवेळा या वर्तना स्वतःनुसार बदल करत त्यानुसार वागू लागतात. याचा किशोरावस्था आणि प्रौढ झाल्यावर सर्वाधिक प्रभाव पडत असतो.









