तर उपाध्यक्षपदी गणेश सातार्डेकर
सातार्डा –
सातार्डा येथील श्री देव रवळनाथ नवरात्रौत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी परशुराम मांजरेकर यांची तर उपाध्यक्षपदी गणेश सातार्डेकर यांची निवड करण्यात आली. श्री रवळनाथ सभागृहामध्ये झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली.नवरात्रौत्सवानिमित्त खुल्या दांडिया – गरबा नृत्य स्पर्ध्येचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी माजी सरपंच उदय पारिपत्ये, श्री देव रवळनाथ कला, क्रीडा, विकास मंडळाचे अध्यक्ष ज्ञानदीप राऊळ, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव राऊळ,माजी ग्रामपंचायत सदस्य आपा राऊळ,श्री देव रवळनाथ नवरात्रौत्सव मंडळाचे कार्यकर्ते अर्जुन सातार्डेकर, रामचंद्र घाडी,अमृत घाडी, प्रदीप धूपकर, अक्षय पेडणेकर, अजित पेडणेकर, उल्हास कांबळी,हर्षद घाडी,रुपेश मांजरेकर,सर्वेश पेडणेकर, श्यामलाल नायर,व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
दि 17 ते 22 ऑक्टोबर 23 या कालावधीमध्ये खुली दांडिया – गरबा नृत्य स्पर्धा होणार असून प्रथम विजेत्या ग्रुपला उद्धव ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब पुरस्कृत रू 21,001/- व चषक,द्वितीय विजेत्या ग्रुपला श्री देव रवळनाथ नवरात्रौत्सव मंडळ पुरस्कृत रू 11,001/- व चषक,तृतीय ग्रुपला सामाजिक कार्यकर्ते विनय राऊळ पुरस्कृत रू 5,001/- व चषक,उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय प्रत्येकी रू 2000/- व चषक देण्यात येणार आहे. इच्छुक दांडिया ग्रुपनी मंडळाचे कार्यकर्ते अर्जुन घाडी मो न 8007411331, संजू माणियत यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच यावर्षी मंडळाच्यावतीने लकी ड्रॉ सोडत ठेवण्यात आली आहे. या देणगी कुपनना सहकार्य करावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री मांजरेकर यांनी केले आहे.









