Kokan : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक गेल्या जुलै महिन्यांपासून पूर्णपणे विस्कळीत आहे. रात्रीच्यावेळी पूर्णपणे बंद असलेला हा घाट आता गणेशोत्सवापूर्वीच 24 तास वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती आमदार शेखर निकम यांनी काल शनिवारी (ता.13) येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
गेल्या महिन्यात जोरदार पावसात दरडी कोसळल्याने तसेच माथ्यावरील परशुरामच्या डोंगराला भेगा गेल्याने 5 जुलैपासून काही दिवस हा घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर 14 जुलैपासून अटीशर्तींवर केवळ
अवजड वाहनांच्या एकेरी मार्गासाठी हा घाट सुरू करण्यात आला. तर सायंकाळी 7 नंतर घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये हलक्या वाहनांना घाटातून प्रवेश न देता पर्यायी
मार्गाने वळवण्यात आले. दीर्घकाळ घाट बंद असल्याने परशुराम देवस्थान, शाळा-महाविद्यालये, औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी होत असलेल्या नुकसानीबाबत ओरड होऊनही प्रशासनाने आजतागायत या घाटाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याचबरोबर गणेशोत्सव जवळ आल्याने अशा परिस्थितीत घाटाचे काय होणार, असा सवाल उपस्थित केला जात होता.
दरम्यान, या संदर्भात आमदार निकम यांना पत्रकारांनी शनिवारी छेडले असता ते म्हणाले की, तसे पाहिले तर मध्यंतरी पाऊस कमी कमी झाला असतानाच घाट सुरू करण्याबाबत निर्णय होणार होता. मात्र त्यानंतर पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला गेला. शिवाय पाऊसही जोरदार कोसळला. त्यामुळे घाट सुरू करण्याबाबतचा निर्णय काहीसा लांबणीवर टाकण्यात आला. मात्र आता या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. पावसाचा अंदाज घेऊन गणेशोत्सवापूर्वीच हा घाट 24 तास वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









