वृत्तसंस्था/ रोम
इटलीच्या जस्मिन पाओलिनीने येथे झालेल्या इटालियन ओपन स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावताना अंतिम फेरीत अमेरिकेच्या जागतिक तिसऱ्या मानांकित कोको गॉफला पराभवाचा धक्का दिला.
पाओलिनीने गॉफवर 6-4, 6-2 अशी मात करीत जेतेपद पटकावले. गेल्या 40 वर्षात इटालियन महिलेने येथे जिंकले पहिलेच जेतेपद आहे. यापूर्वी 1985 मध्ये राफाएला रेगीने महिला एकेरीत जेतेपद पटकावले होते. क्लेकोर्टवरील तिचे हे आजवरचे सर्वोत्तम यश असून तिचे हे दुसरे 1000 स्तरावरील दुसरे जेतेपद आहे. याआधी तिने दुबई चॅम्पियनशिपमध्ये गेल्या वर्षी अजिंक्यपद पटकावले होते. गेल्या वर्षी पाओलिनीने प्रेंच ओपन स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. 25 मे पासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. पाओलिनी व गॉफ यांच्यात याआधी तीन लढती झाल्या होत्या, त्यापैकी दोन गॉफने जिंकल्या होत्या. पाओलिनीला आणखी एक जेतेपद मिळविण्याची संधी असून महिला दुहेरीत तिने सारा इराणीसमवेत अंतिम फेरी गाठली आहे.









