वृत्तसंस्था / रियाद
2025 च्या डब्ल्यूटीए महिलांच्या फायनल्स टेनिस स्पर्धेत अमेरिकेची विद्यमान विजेती कोको गॉफने इटलीच्या पाओलिनीचा पराभव करत आपले आव्हान जीवंत ठेवले आहे.
21 वर्षीय कोको गॉफने पाओलिनीचा 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. गॉफने या सामन्यात केवळ तिन दुहेरी चूका केल्या. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गॉफने 17 दुहेरी चुका केल्या होत्या. आता गॉफचा पुढील फेरीतील सामना टॉपसिडेड साबालेंकाबरोबर होणार आहे. पाओलिनीने या स्पर्धेत आतापर्यंत दोन सामने गमविले असल्याने तिचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. साबालेंकाने पेगुलाचा 6-4, 2-6, 6-3 असा पराभव करत आपल्या गटातून आघाडीचे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत पाओलिनी सारा इराणीबराब्sार दुहेरी खेळत आहे.









