वृत्तसंस्था/ अहमदाबाद
2023 च्या प्रो कबड्डी लीग हंगामातील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने बंगाल वॉरियर्सला 28-28 अशा गुणांनी बरोबरीत टाकले. हा सामना शेवटच्या मिनिटापर्यंत अटीतटीचा झाला.
या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सतर्फे भवानी रजपूतने सुपर 10 नोंदविला. तर बंगाल वॉरियर्सतर्फे श्रीकांत जाधवने सर्वाधिक म्हणजे 7 गुण नोंदविले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत जयपूर पिंक पँथर्सने बंगाल वॉरियर्सवर 13-9 अशी आघाडी घेतली होती. पँथर्सने आक्रमक चढाया करत बंगाल वॉरियर्सच्या खेळाडूंवर दडपण आणले होते. सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या पाचच मिनिटांच्या कालावधीत बंगाल वॉरियर्सने पहिल्यांदा पिंक पँथर्सचे सर्व गडी बाद करून 16-13 अशी आघाडी मिळविली होती. बंगाल वॉरियर्सने सामन्याच्या उत्तरार्धात आक्रमक चढायावर गुण वसूल करत अखेर हा सामना 28-28 असा बरोबरीत राखला.









