वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील येथे रविवारी खेळविण्यात आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला षटकांची गती राखता न आल्याने या संघाचा कर्णधार ऋषभ पंतला आयपीएलच्या नियमानुसार 12 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने विद्यमान विजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा 20 धावांनी पराभव केला. चेन्नईचा या स्पर्धेतील हा पहिला पराभव आहे. सदर सामन्यामध्ये पृथ्वी शॉ आणि वॉर्नर यांनी दिल्लीच्या डावाला दमदार सुरुवात करुन दिली होती. दिल्ली कॅपिटल्सचे मुकेशकुमार आणि खलिल अहमद हे प्रभावी गोलंदाज ठरले. मात्र महेंद्रसिंग धोनीची 16 चेंडूतील नाबाद 37 धावांची खेळी वाया गेली. दिल्ली कॅपिटल्सचा या स्पर्धेतील हा पहिला विजय आहे.









