वृत्तसंस्था / कोलकत्ता
2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लखनौ सुपर जायंटस् संघाच्या कर्णधारपदी यष्टीरक्षक आणि आक्रमक फलंदाज रिषभ पंतची नियुक्ती करण्यात आली आहे.
लखनौ सुपर जायंटस्चे संजीव गोयंका हे मालक आहेत. आयपीएल स्पर्धेसाठी झालेल्या लिलावामध्ये लखनौ संघाचे फ्रांचायझी गोयंका यांनी 27 कोटी रुपयांच्या बोलीवर रिषभ पंतला खरेदी केले होते. आयपीएल स्पर्धेत दुसऱ्यांदा रिषभ पंत कप्तानपद भूषवित आहे. यापूर्वी तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. रिषभ पंतला खरेदी करण्यासाठी लखनौ आणि सनरायझर्स हैदराबाद संघामध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती. हैदराबाद संघाने पंतवर 20.75 कोटी रुपयांची बोली लावली होती. पण लखनौने 27 कोटी रुपयांच्या बोलीवर त्याला खरेदी केले.









