महाराष्ट्राच्या आगामी विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने आज आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली असून लोकसभेला पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या पक्षांमध्ये उभी फुट पडल्यानंतर ही पहिलीच विधानपरिषदेची निवडणुक होत आहे.
आज विधानपरिषदेसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करताना भारतीय जनता पक्षाने अनेक उमेदवारांना दिलासा दिला आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका होत आहेत. 288 सदस्यांच्या या सभागृहात 14 जागा रिक्त असून आणि इलेक्टोरल कॉलेज 274 आहे.
भाजपने जाहीर केलेल्या या यादीमध्ये बीड लोकसभेच्या पराभूत उमेदवार पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. या विधानपरिषदेद्वारे पक्षाकडून पंकजा मुंडे यांचे राजकिय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला आहे. पंकजा मुंडे यांच्या बरोबरच सदाभाऊ खोत यांचाही समावेश आहे. सदाभाऊ खोतांना विधानपरिषदेचे तिकीट देऊन भाजपने शेतकरी नेत्याला संधी दिली आहे. भाजपने योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे यांनाही संधी दिली आहे.