Dhananjay Munde Pankaja Munde : राज्याच्या मंत्रीपदी धनंजय मुंडे यांची नियुक्ती झाल्या नंतर काल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच कौतुकानं औक्षण केलं. याचा व्हिडिओ आज धनंजय मुंडे यांनी ट्विट केला आहे. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर,बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित असल्याचा संदेश त्यांनी दिला आहे.
राजकारणात हे दोघे अनेकदा एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. मात्र काल धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.आणि कौतुकाने पंकजा मुंडे यांनी भावचं औक्षण केलं आणि शुभेच्छा दिल्या. बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित असल्याचा संदेश या दोघांकडून दिला गेला असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
https://twitter.com/dhananjay_munde/status/1677182595787010048?s=20
महाराष्ट्रातील लोकांसाठी हे आश्वासक दृष्य आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवारांनी भाजपसोबत हातमिळवणी केली.मात्र अशा परिस्थितीत हे दोन बहीण भाऊ एकत्र आले आहेत.यापूर्वी देखील हे दोघे बहिण भाऊ अनेकवेळा एकत्र आले. मात्र काल मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते पंकजा मुंडे यांच्या घरी गेले. यावेळी पंकजांकडून धनंजय यांचं कौतुकानं औक्षण करण्यात आलं.ही भेट मराठवाड्याच्या राजकारणासाठी, राज्याच्या राजकारणासाठी आशादायक अस चित्र आहे. राष्ट्रवादी आणि भाजप आता एकत्र काम करणार आहे.








