राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी काल नावे जाहीर झाली. मात्र यात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे नाव नसल्याने त्या नाराज आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. फडणवीसांना गैरसमज झाले असतील तर त्यांनी ते व्यक्त करायला हवेत. त्यांनी अशा गोष्टी मनात ठेवू नयेत, असे वक्तव्य केले. कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) एक चांगला गुण आणि त्यांच्यासाठी एक सल्ला काय असेल, असे विचारल्यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.
यावेळी त्या म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संयमी नेते आहेत. त्यांना काही वाटत असेल किंवा गैरसमज झाले असतील तर त्यांनी ते व्यक्त करायला हवेत. त्यांनी अशा गोष्टी मनात ठेवू नयेत, अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमात अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांना गाण्याचा आग्रह धरण्यात आला. ‘हमारी मुठ्ठी मै आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा’ या गाण्याच्या ओळी पंकजा यांनी गुणगुणल्या. तसेच मी राजकारणात असल्याने गाणे गाण्याची गरज नाही. तशीही तिथे मोठी गर्दी आहे, अशी टिप्पणीही पंकजा मुंडे यांनी केली.
आमदारकीवरुन पंकजा मुंडेंचे वक्तव्य, म्हणाल्या
विधान परिषदेसाठी अनेक नावांची चर्चा आहे. यात माझ्याही नावाची चर्चा होत आहे. कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे,मी विधानपरिषदेवर जावं. मात्र पक्ष जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असे वक्तव्य आमदारकीवरुन पंकजा मुंडे यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनीही पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याविषयी सकारात्मक संकेत दिले होते. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी आता देवेंद्र फडणवीसांशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली आहे का?अशी चर्चा सुरु आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








