ऑनलाईन टीम/तरुण भारत
ज्याप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होतो त्याच प्रमाणे पंकजा मुंडे (Pankaja Munde) देखील बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे दसरा मेळावा घेत असतात. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. सावरगावातून जनतेला आणि मतदारांना एक संदेश दिला जातो. पण भगवान गडावरचा दसरा मेळावा (Bhagwangad Dasara Melava) पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात सापडला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडी, मालेवाडी आणि बीड जिल्ह्यातील घोगस पारगाव या गावांनी हा ठराव घेतला आहे.
दरम्यान, २०१५ साली पंकजा मुंडेंना भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यास महंत नामदेव शास्त्री यांनी विरोध केला. आता त्यानंतर यावर्षी दसरा मेळावा कृती समितीने इथेच मेळावा घेण्याचं जाहीर केलं. पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा चर्चेत आला. मात्र भगवानगडावर दसरा मेळावा घेऊ नये, असा ठराव भगवान गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांनी घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडी, मालेवाडी आणि बीड जिल्ह्यातील घोगस पारगाव या गावांनी हा ठराव घेतला आहे.
हे ही वाचा : …मग घ्या ना धौती योग! ‘सामना’च्या अग्रलेखाला भाजपचं प्रत्युत्तर
गडाच्या पाच किलोमीटर अंतरावर कोणताही दसरा मेळावा घेऊ नये असं या पत्रकात म्हटल आहे. संत भगवान बाबांच्या गडावर कुठल्याही प्रकारचा सामाजिक/राजकीय दसरा मेळावा आणि भाषणास प्रतिबंध घालण्यात यावा. परंपरेनुसार दसऱ्याच्या दिवशी केवळ संत भगवान बाबा समाधीचे दर्शन आणि सीमोल्लंघन यासाठीच भाविकांना परवानगी द्यावी, असा ठराव यावेळी घेण्यात आलाय. याबाबत पंकजा मुंडे यांनी कोणतीही भूमिका माध्यमांसमोर मांडलेली नाही. मात्र आता भगवान गडावरील दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.