वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय सायकलिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उत्तर प्रदेश विधानसभेचे आमदार पंकज सिंग यांनी आपला निवडणूक अर्ज दाखल केला आहे.
अखिल भारतीय सायकलिंग फेडरेशनच्या व्यवस्थापन समितीची तसेच इतर पदांसाठी निवडणूक होणार आहे. या विविध पदांसाठी इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. या संघटनेच्या सचिवपदी सलग दुसऱ्यांदा मनिंदर पाल निवडणूक लढवणार आहेत. केरळचे सुदेशकुमार हे खजिनदार पदासाठी निवडणूक लढवित आहेत. 24 एप्रिल रोजी उत्तराखंडमधील नैनिताल येथे निवडणूक प्रक्रिया होणार आहेत.









