वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेश राज्याच्या शुटींग अकादमी संकुलात सुरू असलेल्या पुरुष आणि महिलांच्या निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेत पंकज मुखेजा तसेच हरियाणाच्या नॅन्सीने व रिदम सांगवान यांनी विजेतीपदे मिळवली.
पुरुषांच्या 50 मी. रायफल थ्री पोझीशन प्रकारात पंकज मुखेजाने प्रथम स्थानासह विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतील तिसऱ्या दिवशी गट 1 मधील निवड चाचणी घेतली गेली. हरियाणाची महिला नेमबाज नॅन्सीने महिलांच्या 10 मी. एअर रायफल टी थ्री नेमबाजीत पहिले स्थान पटकावले. तसेच हरियाणाची आण्खी एक महिला नेमबाज रिदम सांगवानने महिलांच्या 25 मी. टी 4 पिस्तुल नेमबाजीत प्रथम स्थान घेतले. पुरुषांच्या विभागात पंकज मुखेजाने 50 मी. रायफल नेमबाजीत स्वप्नील कुसाळेचा 16-12 असा पराभव करत विजेतेपद हस्तगत केले. हरियाणाच्या रिदम सांगवानने महिलांच्या 25 मी. पिस्तूल नेमबाजीत प्रथम स्थान मिळवले असून तिने 32 गुण नेंदवले. तर उत्तर प्रदेशच्या नेहाने दुसरे तर तेलंगणाच्या इशा सिंगने तिसरे स्थान घेतले. कनिष्ठांच्या विभागात मध्यप्रदेशच्या गौतमी भानोतने महिलांच्या 10 मी. टी थ्री एयर रायफल नेमबाजीत सुवर्णपदक तर दिल्लीच्या नेमा कपुरने महिलांच्या 25 मी. पिस्तूल नेमबाजीत सुवर्णपदक तसेच दिल्लीच्या शिवम दबासने कनिष्ठ पुरुषांच्या 50 मी. थ्री पोझीशन रायफल नेमबाजीत सुवर्णपदक घेतले.









