वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे सुरु असलेल्या 2024 च्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या 61 किलो वजन गटातील फ्री स्टाईल प्रकारात पंकज मलिकने सुवर्णपदक पटकाविताना अव्वल मल्ल ललीत कौशलचा पराभव केला.
या स्पर्धेत सेनादल क्रीडा मंडळाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या 28 वर्षीय पंकज मलिकने आपल्या शानदार डावपेचांच्या जोरावर ललीत कौशलचा सरस गुणावर पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. पंकज मलिकला ऑलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशीलकुमारचे मार्गदर्शन लाभत आहे. सदर स्पर्धा कर्नाटक कुस्ती फेडरेशनने आयोजित केली आहे.









