वृत्तसंस्था/ रियाद
पंकज अडवानी आणि ध्रुव सितवाला यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत ध्रुवची कामगिरी पंकजच्या तुलनेत अधिक दर्जेदार झाली. ध्रुवने सुरुवातीलाच 103 गुण नोंदवित दमदार सलामी दिली असताना पंकजला आपले खातेही उघडता आले नव्हते. त्यानंतर पंकजने 36 गुण मिळविले. ध्रुवने शतकी ब्रेक नोंदविला. दरम्यान पंकजने शतकी ब्रेक नोंदवून सामन्याला रंगत आणली. पण शेवटी ध्रुवने पंकजचा 5-2 असा पराभव करत या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. या पराभवामुळे पंकजची या स्पर्धेत जेतेपदाची हॅट्ट्रीक हुकली.









