कपाटातील 3.60 लाखाचे दागिने पळविले
पणजी : येथील सांत इनेज भागात काल सोमवारी दिवसाढवळ्या चोरट्यांनी सर्वेश फडके यांचा फ्लॅट फोडून सुमारे 3 लाख 60 हजार ऊपये किंमतीचे सोने, चांदीचे दागिने पळविले. पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी सकाळी 9.30 ते दुपारी 3 च्या दरम्यान घडली आहे. फ्लॅटमधील मंडळी सकाळी 9.30 च्या सुमारास कामावर गेली, तर मुले शाळेत गेली. त्यानंतर चोरट्यांनी फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. कपाटात असलेले सोने व चांदीचे दागिने लंपास केले. दुपारी तीन वाजता घरची मंडळी परत आल्यावर फ्लॅटचे दार उघडे असल्याचे दिसले. फ्लॅटमधील सामान अस्ताव्यस्त फेकले होते. कपाट फोडून त्यातील 3 लाख 60 हजार ऊपये किंमतीचे दागिने लंपास केल्याचे दिसून आले. पणजी पोलीस स्थानकाच्या महिला उपनिरीक्षक सपना गावस पुढील तपास करीत आहे.









