वार्ताहर/उचगाव
उचगाव-कोवाड मार्गावरील बसुर्ते क्रॉस येथे हेस्कॉमच्या ट्रान्स्फॉर्मरजवळील मीटरमध्ये बिघाड झाल्याने अचानक पेट घेतल्याने जवळपासच्या नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. या घटनेनंतर विद्युतपुरवठा खंडित केला होता. घटनेची अधिक माहिती अशी की, बसुर्ते क्रॉस येथे उचगावमधील अनेक नागरिकांची राहती घरे आहेत. यासाठी या भागात हेस्कॉमचा ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आला आहे. ट्रान्स्फॉर्मरजवळ मीटर आहे. बुधवारी रात्री सातच्या सुमाराला अचानक या ट्रान्सफॉर्मरजवळील मीटरमध्ये जोरदार स्फोट होऊन मोठमोठ्या ज्वाला बाहेर पडायला सुऊवात झाल्या. ज्वाला इतक्या भयानक होत्या की, येथील नागरिक भयभीत झाले. ज्वालांसह विजा बाहेर पडत होत्या. यामुळे जवळपास राहणाऱ्या घरातील नागरिक भयभीत झाले होते. यावेळी उचगाव विभागाच्या हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी तातडीने विद्युत पुरवठा खंडित केला. रात्री तातडीने याची दुऊस्ती करून वीज पुरवठा सुरळीत सुरू केला. मात्र ट्रान्स्फॉर्मरमधील दुरुस्ती गुऊवारी होणार असल्याचे हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.









