पन्हाळा/अबिद मोकाशी
गेल्या महिन्यांपासून पन्हाळगडावर शनिवारी, रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी प्रवासी कर नाक्यावर नाकाबंदी करुन दुचाकीसह चारचाकी वाहनांची तपासणी सुरु केली आहे. मद्यप्राशन करुन हुल्लडबाजीसाठी आलेल्या तरुणांना यामुळे चाप बसू लागला आहे. पोलीस अधीक्षक शैलेंद्र बलकवड व शाहूवाडी विभागाचे पोलीस उपधीक्षक रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळ्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी हि कारवाई सुरु केली आहे.
गेल्या महिन्याभरात पन्हाळा पोलिसांनी विना परवाना वाहन चालविणाऱ्या, मद्यप्रशान करुन वाहन चालवणाऱ्या तसेच नियमबाह्यरित्या दुचाकीवरुन तिब्बल सीट प्रवास करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करुन हजारो रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे कुटुंबवत्सल पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापुराहून सर्वात जवळचे पर्यटनस्थळ, निसर्गाचा ठेवा लाभलेले ऐतिहासिक ठिकाण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे हिल स्टेशन अशी पन्हाळगडाची ख्याती आहे. त्यामुळे उन्हाळा असो अथवा पावसाळा पन्हाळा नेहमीच पर्यटकांनी फुल्ल असतो. पर्यटकांमुळे पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेला दररोज हजारो रुपयांचा प्रवासी कर मिळतो. मात्र ठराविक जणांमुळे ऐतिहासिक पन्हाळगडाचे नाव खराब होते.
मध्यंतरी येथील काही नागरिकन प्रवासी कर नाक्यावरच ठिय्या मारुन स्कार्फ बांधुन येणाऱ्या युवक-युवतांना तोंडावरील स्कार्फ उतरायला लावून गडावर सोडत होते. पण त्यांच्या या प्रयत्नांना मर्यादा पडत होत्या. आता पोलिसांनीच मनावर घेतल्याने अशा तरुणाईला तसेच हुल्लडबाज लोक़ांना आवरणे सहज शक्य बनले आहे. प्रवासी कर नाक्याबरोबरच गडावर सर्वत्र पोलीस कारवाई करत आहेत. यामुळे गडावर एक वेगळी शिस्त बसेल, कुटुंबवत्सल पर्यटक अधिक संख्येने पन्हाळगडावर येतील आणि गडाचे पावित्र्य राखले जाईल हे निश्चित, फक्त पोलिसांच्या या कारवाईला सर्वांचेच सहकार्य गरजेचे आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








