हजारो नागरिकांच्या उत्साहपूर्ण सहभागाने मोहिम फत्ते केली जाते
कोल्हापूर : पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम ही महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाचा स्मरणोत्सव या माध्यमातून साजरा केला जातो. दरवर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्याच्या कालावधीत विविध संस्था, संघटना, ट्रेकर, तालीम–मंडळांकडून पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन केले जाते.
हजारो नागरिकांच्या उत्साहपूर्ण सहभागाने मोहिम फत्ते केली जाते. यंदा 10 जुलैपासून मोहिमांना प्रारंभ होणार आहे. या मोहिमेद्वारे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे शूर मावळे, विशेषत: नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे व त्यागाचे स्मरण केले जाते.
नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या 300 मावळ्यांनी पावनखिंडीत (पूर्वी घोडखिंड) शत्रूसैन्याशी शौर्याने लढा दिला. बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. पावनखिंडीतील या ऐतिहासिक लढाईच्या स्मरणार्थ ही पदभ्रमंती आयोजित केली जाते.
मैत्रेय प्रतिष्ठानच्यावतीने गुरूवार दि.10 रोजी मोहिमेला सुरूवात केली जाणार आहे. प्रतिष्ठानतर्फे पावनखिंड संग्राम स्मृती यात्रा या उपक्रमाद्वारे किल्ले पन्हाळगड ते कासारी उगमपर्यंत साहसी रात्र मोहिमेचे आयोजन केले आहे. सायंकाळी 5 वाजता शिवाजी पुल येथुन शिवरायांच्या जयघोषात पन्हाळा गडाकडे रवाना होणार आहेत.
पन्हाळा येथे पोहोचल्यानंतर वीर शिवा काशीद व नरवीर बाजीप्रभूंना वंदन करून मोहिमेला सुरूवात होणार आहे. हिल रायडर्सच्या मोहिमेत हजारोंचा सहभागंयंदा हिल रायडर्सच्यावतीने या मोहिमेची जय्यत तयारी सुरू आहे. सुरवातीला नगण्य सहभाग असणाऱ्या मोहिमेत आता एक हजार ते पंधराशे नागरिक सहभागी होतात.
यंदा दोन मोहिमांचे आयोजन केले आहे. पहिली मोहिम शनिवार दि. 19 व 20 रोजी आयोजित केली आहे. तर दुसरी मेहिम 26 व 27 रोजी आयोजित केली आहे. आरोग्याच्या दृष्टीने महत्वमोहिमेत सहभागी झाल्याने मनाला समाधान मिळते. निसर्गातील वातावरणामुळे तणाव दुर होतो.
मन उत्साही बनते. प्रशासनाचे सहकार्य :दरवर्षी हजारो शिवप्रेमी, तरुण, इतिहासप्रेमी, ट्रेकर्स आणि स्थानिक नागरिक या मोहिमेत सहभागी होतात. विविध ट्रेकिंग ग्रुप्स, सामाजिक संघटना आणि स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी होते.
मोहिमेला वाढता ओघ कोल्हापूर आणि सातारा जिह्यातील अनेक स्वयंसेवी संस्था, शिवप्रेमी गट आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचे आयोजन केले जाते. यात सहभागींसाठी पाणी, निवास, प्रथमोपचार व्यवस्था केली जाते.
ऐतिहासिक स्मरण: ही मोहीम केवळ ट्रेकिंगपुरती मर्यादित नसून शौर्याची आणि बलिदानाची कहाणी नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे. मार्गात ठिकठिकाणी बाजीप्रभूंच्या पराक्रमाची माहिती सांगितली जाते.
अशी होते पदभ्रमंती
पन्हाळा येथील नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोहिमला सुरूवात केली जाते. सुमारे 50 किलोमीटरचाहा मार्ग डोंगराळ, खड्ड्यांनी भरलेला आणि घनदाट जंगलातून पायी पुर्ण केला जातो. यातून त्या काळातील कठीण प्रवासाची आठवण करून देतो.
यातून शिवप्रेरणेसह जिद्द, चिकाटी, साहस निर्माण होते. मसाई पठार, कुंभारवाडी, खोतवाडी, कर्पेवाडी, आंsबवडे, कळकेवाडी, रिंगेवाडी, पारेवाडी, धनगरवाडा, मान, पांढरेपाणी मार्गे पावनखिंड येथे मोहिम पूर्ण केली जाते.
पर्यटनाच्या दृष्टीने महत्व
प्रत्येक भारतीयाने या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे. यातून सह्याद्रीच्या निसर्गाचे महत्व कळते. एकजुटी, सांघिकपणा वाढतो. एकमेकाला मदत करण्याची भावना निर्माण होते. सह्याद्रीचा हिरवागार डोंगर, धबधबे आणि घनदाट जंगल यामुळे सहभागींना साहसाचा अनुभव मिळतो.
सामाजिक एकतेचे दर्शन घडते. या मोहिमेमुळे पन्हाळा, पावनखिंड आणि विशाळगड या ऐतिहासिक स्थळांना पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे. – प्रमोद पाटील, अध्यक्ष, हिलरायडर्स अँड अॅडव्हेंचर फौंडेशनअशी








