इर्षाळगडच्या दुर्घटना ताजी असतानाच पन्हाळा तालुक्यातील नावली या गावातील डोंगर खचल्याची बातमी समोर येत आहे. इर्शाळगडाची घटना घडण्याआधी भारतीय हवामान विभागाच्या सतर्क या अँपने दरड कोसळण्याची भिती व्यक्त करून इशारा दिला होता. या अँपने कोल्हापूरलाही या धोक्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज हि घटना समोर आली आहे.
पन्हाळा तालुक्यातील नावली पैकी धारवाडी येथे डोंगर खचला असून सर्वत्र भेगा पडल्या आहेत. डोंगराला सर्वत्र भेगा पडल्याने गावातील घरांना देखील तडे पडले आहेत. या प्रकारामुळे गावकरी भयभीत झाले असून ज्या ज्या घरांना अशा प्रकारे तडे गेले आहेत त्यांनी घरातील सामान आवरले असून सुरक्षित स्थळी जाण्यास तयारी करत आहेत. दरम्यान, नावली पैकी धारवाडी या परिसरात राहणाऱ्या तीस कुटुंबाला प्रशासनाकडून दखल घेत नावली येते हलवण्याचा प्रशासनाचा निर्णय घेतला असून धारवाडीतील तीस कुटूंबाना तात्काळ स्थलांतर होत आहे.
पन्हाळ्याच्या पुर्व पायथ्याला आपटी पैकी सोमवार पेठ च्या खालील बाजुस धारवाडी हे अंदाजे शंभर लोकसंख्या असलेली छोटी वाडी आहे या वाडीचे वरील बाजूस भैरवनाथ मंदिर आहे या ठिकाणी मुसळधार पावसामुळे दुपारी पासून भुस्खलन सुरू झाले आहे भुस्खलन होणाऱ्या परीसरात फक्त भैरवनाथ मंदिर आहे मानवी वस्ती अथवा घरे नसल्याने घरांना अद्याप कोणतीही धोका झालेला नाही प्रशासन यंत्रणा सज्ज असुन तहसीलदार माधवी शिंदे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे
भारतीय हवामान विभागाने विकसित केलेले सतर्क या अँपने कोल्हापूर जिल्ह्यावर देखिल अशा प्रकारचे संकट येण्याचा धोका व्यक्त केला होता. ‘सतर्क’ या अॅपने त्याबाबतचा इशारा आदल्या दिवशी दिला होता. आता त्याच ‘सतर्क’ने गोवा राज्यासह महाराष्ट्रतील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यात दरड कोसळण्याचा इशारा दिला होता.









