कोल्हापूर: पन्हाळा येथील अवकाशात दिसून आलेली उडती तबकडी नसून, तो हवामान खात्याचा बलून असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठातील पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्राचे संचालक डाॅ. राजू व्हटकर यांनी दिली. या बलूनचा उपयोग हवेतील तापमान, दाब, दिशा, वेग आणि हवेची आद्रता तपासण्यासाठी केला जातो असेही त्यांनी सांगितले.
सध्या मान्सूनचे वारे वाहत असल्याने हा बलून गोव्यातील हवामान खात्याने कोल्हापूरच्या दिशेकडे सोडण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या बलूनने संकलित केलेली माहिती रेडिओ लहरीद्वारे ज्या केंद्राने हा बलून सोडला आहे त्यांच्यापर्यंत पोहचण्यास मदत होते. तसेच काही अंतरावर गेल्यावर हा बलून फुटून जमिनीवर पडतो. जमिनीपासून याचे अंतर जास्त असल्याने तो आकाशात असताना कमी वेगाने जातो. यामुळे आकाशात आपल्याला तबकडी असल्याचा भास होतो असेही त्यांनी स्पष्ट केले.
नेमके काय घडले
आज सकाळी पन्हाळा तालुक्यात आकाशात सुमारे तीन तास खुप उंचीवर पांढरी शुभ्र वस्तू दिसुन आली. आकाशात दिसणारी वस्तू अत्यंत कमी वेगाने पुढे सरकत असल्याचे जाणवत होते. पन्हाळा येथील रमेश पाटील यांना या पांढऱ्या गोलाबाबत वेगळेपण जाणवल्याने त्यांनी शिवाजी विद्यापीठ अवकाश संशोधन केंद्रात संपर्क केला. पण तो अयशस्वी ठरला. पुढे त्यांनी त्याचे निरीक्षण केले, हा गोल उत्तर दिशेला सरकत गेला आणि मग पन्हाळ्यातून दिसेनासा झाला, असे रमेश पाटील यांनी सांगितले. रमेश पाटील यांनी आपल्या मोबाईलवर या घटनेचा व्हिडिओ बनवला आहे. तो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यातुन अनेक तर्क- वितर्क नागरीकांनी काढले आहेत. आकाशात उडती तबकडी असल्याच्या अफवा पसरल्या गेल्या. मात्र शिवाजी विद्यापीठाच्या संशोधन केंद्राने हा बलून असल्याचे स्पष्ट केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









