आज सकाळी पन्हाळागडावर जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या मुख्य रस्त्यावरील अत्याधुनिक कठड्याच्या बाजूची जमीन अतिवृष्टीने खचल्यानंतर कोल्हापूर विशेष प्रकल्प विभागाने याची पाहणी केली. या पाहणीत मुळ रस्त्याच्या बांधकामाला कोणतीही धोका नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले. तसेच रस्त्याचे बांधकामास कोणतीही हानी झाली नसल्याचे पत्र प्रसिध्द करण्यात आले आहे.
या पत्रात म्हटलं आहे की,
अतिवृष्टीमुळे जुने जकात नाक्याच्या इमारतीच्या बाजूकडील बुरुजा खालील दगडमाती वाहून गेली आहे. हि पायवाट गडाकडे जाते. जिथली माती पाण्याने वाहून गेली आहे. याचा मुख्य रस्त्याला कोणताही धोका नाही. किंवा रस्त्याच्या बांधकामास कोणतीही हानी झालेली नाही.
नेमकं काय घडलं
पन्हाळ्यावरील दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच आहेत. आज सकाळी पन्हाळागडावर जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या मुख्य रस्त्यावरील अत्याधुनिक कठड्याच्या बाजूची जमीन खचली आहे. सकाळी नऊ वाजता जमीन खचल्याची घटना घडली. कठड्याच्या बाजूची जमीन खचल्याने ती केव्हाही खाली कोसळू शकते. यामुळे पन्हाळ्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावऱण पसरले आहे.तर सकाळी साडेआठ वाजल्यापासून दरड कोसळण्यास सुरवात झाली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









