साखळी : साखळी नगरपालिका निवडणुकिसाठी बुधवारी संध्याकाळी टुगेदर फॉर साखळी गटाने आपल्या उमेदवारांचे पेनल जाहीर केले. त्यामुळे आता साखळीच्या नगरपालिका निवडणुकीत खरा रंग भरला आहे. टुगेदर फॉर साखळी पेनलतर्फे प्रभाग क्र. 1 मध्ये कुंदा माडकर, प्रभाग 2 मध्ये इशा सगलानी, प्रभाग 3 मध्ये सुनिता वेरेकर, प्रभाग 4 मध्ये धर्मेश सगलानी, प्रभाग 6 मध्ये डॉ. सरोज देसाई, प्रभाग 7 मध्ये संपतराव देसाई, प्रभाग 9 मध्ये भाग्यश्री ब्लेगन, प्रभाग 10 मध्ये राजेंद्र आमेशकर, प्रभाग 11 मध्ये रश्मी घाडी व प्रभाग 12 मध्ये आश्विनी कामत. प्रभाग 5 मध्ये प्रवीण ब्लेगन हे बिनविरोध निवडून आल्याने या पेशलचे खाते नगरपालिकेत खुलले आहे.
आम्ही पक्ष पातळीवर निवडणूक लढत नाही : टोगेटर फॉर सांखळी
टुगेदर फॉर साखळी पुन्हा निवडणुकीत उतरले असून गेली दहा वर्षे हे पेनल सत्तेत होते. तर त्यापूर्वीही सत्तेत राहून काम केले आहे. या 15 वर्षांच्या कार्यकाळात राजकारण न करता केवळ समाजकार्य व विकास केला. फोडाफोडीच्या राजकारणात आमचे सहा नगरसेवक भाजपमध्ये गेले. आम्ही कोणताही दबाव न लादता आतापर्यंत कामे केली आहे. प्रत्येक प्रभागांमध्ये सर्व आवश्यक विकास केलेला आहे. भारतीय संविधानानुसार नगरपालिका निवडणुका पक्षपातळीवर होत नाही. आम्ही भारतीय संविधानचा आदर राखून पक्षाच्या नावावर निवडणूक लढत नाही. समाजकार्य व सर्वांगीण विकास करण्यासाठी पुढे आलेले आहेत.
यापूर्वी आपल्या गटातील उमेदवार भाजपने पळवून नेले : सगलानी
भाजप सरकारात तीन दांपत्ये असून मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर आरोप करण्यापूर्वी आपल्या सरकारातील कुटुंबराज ओळखावे. यापूर्वी आमच्या गटातील उमेदवार भाजपने पळवून नेले. त्यासाठीच आपली पत्नी, प्रवीण ब्लेगन यांची कन्या यांना रिंगणात उतरविलेआहे. आपली पत्नी आपणास सोडून इतर.पक्षात जाणार नाही, हा विश्वास आहे. तसे साखळीत खुप उमेदवार इच्छुक होते. परंतु राजकीय दबाव व सचडाचे राजकारण यामुळे अनेकांनी माघार घेतली. त्यासाठीच आमच्याच कुटुंबातील सदस्यांना रिंगणात उतरावे लागले. असे स्पष्टीकरण धर्मेश सगलानी यां?नी दिले. हे सर्व उमेदवार वैयक्तिक प्रतिमा असलेले उमेदवार आहे. त्यांची प्रतिष्ठा आणि समाजसेवी ओळख यामुळे त्यांना लोकांची पसंती आहे. त्यांना कोणत्याही पक्षाच्या पाठिंब्याची गरज नाही. साखळीचा विकास व लोकांची सेवा हेच आमचे उद्दिष्ट आहे. साखळीत गेली दहा वर्षे काम करताना कधीच कोणत्याही ठरावांना किंवा विकासाला विरोध केला नाही. हे उमेदवार केवळ जनतेचे ऐकणार. तर विरोधी गटातील उमेदवार निवडून आल्यास ते केवळ आपल्या पक्ष श्रेष्ठींचेच ऐकणार. त्यामुळे सर्वांनी विचार करून मतदान करावे. असे आवाहनही सगलनी यांनी यावेळी केले.
केवळ प्रभागाच्या कल्याणासाठी काम करणार : प्रवीण ब्लेगंन
गेली पाच वर्षे टुगेदर फॉर साखळी गटाने सत्ता चालविताना साखळीत लोकांवर अधिक करांचा भर घातलेला नाही. साखळी हि एकमेव नगरपालिका आहे. ज्याने कर वाढविलेला नाही. केवळ सरकारने कचरा कर लावून लोकांवर भार घातला. उमेदवारांचे चेहरे न पाहता नेतृत्वाकडे पहा असे सांगतात. म्हणजेच या भाजपला आपल्याच उमेदवारांवर विश्वास नाही. उलट आम्ही आमच्या उमेदवारांचे चेहरे पहा आणि मतदान करा, असे सांगत आहे. ते कोणत्याही आमिषांना बळी पडणार नाही. तर ते केवळ प्रभागाच्या कल्याणासाठी कार्य करणार. असे नगरसेवक प्रवीण ब्लेगन यांनी म्हटले. आपण टुगेदर फॉर साखळी या पेनलमधूनच निवडून आलेलो असून आज व भविष्यातही याच पेनलमध्ये असणार. असेही स्पष्टीकरण प्रवीण ब्लेगन यांनी दिले.









