मुरगुड : येथील सानिका स्पोर्ट्सतर्फे आयोजित नाईट क्रिकेट स्पर्धेत नील स्पोर्ट्स हिंडलगाने (बेळगाव) बाजी मारत 1 लाख 11 हजार रोख आणि पांडुरंग कुडवे चषक पटकावला. कै.सुशांत महाजन स्पोर्ट्स प्रणित दीपक स्पोर्ट्स मुरगुड हा संघ स्पर्धेत उपविजेता ठरला. मॅन ऑफ द सिरीजचे बक्षिस असणाऱ्या इलेक्ट्रिक बाईकचा विजेता ‘निल’चाच सुशांत कुवाडकर स्वार झाला. तृतीय आणि चतुर्थ क्रमांक अनुक्रमे सानिका स्पोर्ट्स मुरगूड व विराज स्पोर्ट्स हमिदवाडा यांना मिळाला. खंडोबा स्पोर्ट्स नांगनूर हा स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ ठरला. स्पर्धेचे बक्षीस वितरण समरजीतसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. अमरसिंह घोरपडे, शिवानंद माळी, अनंत फर्नाडीस, दत्ता मामा खराडे, एम. पी. पाटील, प्रा. सुनील मगदूम, देवानंद पाटील, वसंत पाटील, नितीन दिंडे, रामभाऊ खराडे, दलित मित्र एकनाथ देशमुख आदी उपस्थित होते. स्वागत पांडुरंग कुडवे, सूत्रसंचालन अनिल पाटील तर सामन्यांचे समालोचन बाळासो मानेर व सुनील घोडके यांनी केले.
वैयक्तिक बक्षिसाचे विजेते
अंतिम सामन्यातील वैयक्तिक बक्षिसाचे विजेते खेळाडू असे, (कंसात संघाचे नाव) – मॅन ऑफ द मॅच – तनिष्क नाईक (नील स्पोर्ट्स हिंडलगा), बेस्ट बॅटस्मन- संदीप मकवाना (कै. सुशांत महाजन स्पोर्ट्स प्रणित दिपक स्पोर्ट्स मुरगूड), बेस्ट बॉलर -साहील मोमीन (कै सुशांत महाजन प्रणित दिपक स्पोर्ट्स मुरगूड), बेस्ट फिल्डर- अरविंद नरके (सानिका स्पोर्ट्स मुरगूड), मॅन ऑफ द सिरीज- सुशांत कुवाडकर (नील स्पोर्ट्स हिंडलगा).









