वार्ताहर/येळ्ळूर
पंडीत नेहरु हायस्कूलच्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत शाळेचे पाच विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाले आहे. या स्पर्धेमध्ये राजू दोडमनी 48 किलो, श्रीशाल करेनी 60 किलो, सुरेश लंगोटी 92 किलो प्रथम, तर ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात कैलाश 65 किलो तर विजय मुतनाळ 71 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकविला आहे. मयुरेश भाकोजी 41 किलो वजनी गटात द्वितीय व पार्थ पाटीलने 55 किलो वजनी गटात तृतिय क्रमांक पटकवेला.









