‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम : सरकारी काम आणि सहा महिने थांब पायंडा बंद
कोल्हापूर प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरकरांची आहे. त्याच्या पुर्ततेसाठी लवकरच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना भेटून विनंती कऊन प्रश्न मार्गी लावू. तसेच सरकारच्या ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निधी देऊन पंचगंगा प्रदुषणमुक्त झाल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे सांगितले. तसेच ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ हा पायंडा आता बंद होणार आहे. कारण ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजना शासकिय अधिकारी व कर्मचारी घराघरात जाऊन पोहोचवत आहेत. या गतिमान सरकारकडून वेगवान कामे सुऊ आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूरातील तपोवन मैदानावर जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार भारत गोगावले, माजी आमदार सुरेश हाळवणकर, चंद्रदीप नरके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्यमंत्री खासगी सचिव अमोल शिंदे, विशेष कार्य अधिकारी अमित हुक्कीरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांचे प्रातिनिधीक स्वऊपात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जनतेच्या मनातील या सरकारने त्यांच्यासाठी विविध योजना आणल्या आहेत. या योजनांसाठी त्यांना खेटे मारायला लागू नयेत, यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुऊ करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून हा उपक्रम सुऊ करण्यात आला आहे. या माध्यमातून सर्व योजनांचे लाभ एकाच छताखाली दिले जात आहेत. आतापर्यंत झालेल्या जवळपास मंत्रिमंडळाच्या 35 बैठकीत सर्वसामान्यांच्या हिताचेच निर्णय सरकारने घेतले आहे. महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजारांचा इन्सेटीव्ह देण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याची अंमलबजावणी केली आहे. आमच्या सरकारने हा 50 हजारांचा इन्सेटीव्ह देण्याचे घोषित कऊन शेतकर्यांच्य खात्यावर पैसेही जमा करायला सुऊवात केली आहे. सतत अवेळी पावसामुळे होणार्या नुकसानीसाठी भरपाईपोटी शेतकऱ्यांकरीता 1500 कोटी ऊपये देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
ते पुढे म्हणाले, सरकारच्या 25:15 योजनेतून गावाचा कायापालट कऊन गावांची समृध्दी करण्याचे सरकारचे सरळ धोरण आहे. गेल्या अकरा महिन्यात केलेल्या कामांमुळे हे सरकार जनप्रिय झाले आहे. याचे श्रेय फक्त मुख्यमंत्री म्हणून माझे एकट्याचेच नसून यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्र्यांचे आहे.
सरकार अनेक नाविन्यपूर्ण कल्याणकारी योजना राबवत आहे. यामध्ये ‘लेक लाडकी लखपती’ ही योजना महिला व मुलींच्या विकासासाठी सुरु करण्यात आली आहे. शेतक्रयांसाठी नमो शेतकरी सन्मान योजनेंतर्गत केंद्र शासन राबवित असलेल्या योजनेत महाराष्ट्र शासनाने आणखी सहा हजार रुपयांची वाढ केल्याने शेतक्रयांना आता 12 हजार रुपये मिळणार आहेत. तसेच राज्याच्या मागणीनुसार केंद्र शासन निधी उपलब्ध करुन देत असल्याबद्दल त्यांनी केंद्र शासनाचे आभारी आहे.
पालकमंत्री केसरकर म्हणाले, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा समतेचा संदेश देणारी, विकासात्मक दूरदृष्टीचे दर्शन घडविणाऱ्या या करवीर नगरीला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गडकिल्ले, संस्थानकालीन वाडे, वास्तू असे ऐतिहासिक वैभव कोल्हापुरात आहे. त्यामुळे जयपूरप्रमाणे कोल्हापूरचे हे ऐतिहासिक वैभव देशपातळीवर पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. येथील पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष निधी द्यावा.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापुरातील या सभेने आतापर्यंतच्या उपस्थितीचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने लोकहिताचे निर्णय घेतले आहे. सततच्या पावसामळे होणाऱ्या नुकसानीसाठी 1500 कोटींची भरपाईला कॅबिनेटने मंजूरी दिली आहे. कंत्राटी ग्रामसेवकांचा 6 हजार वरून 16 हजार पगार केला आहे.
उद्योगमंत्री सामंत म्हणाले, पुढील सहा महिन्यांत एमआयडीचे विस्तरीकरण करण्यात येणार असून यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न संपेल. एकीकडे सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. त्यामुळे विरोधकांनी राजकारण करू नये. सत्तेत असताना त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. नागरीक मागण्यासाठी गेल्यानंतर तत्कालिन उद्योगमंत्री केबिनमध्येही घेत नव्हते.
राजेश क्षीरसागर म्हणाले, सद्याच्या सरकारने वर्षभरामध्ये सर्वसामान्यांना हिताच्या योजना आणल्या आहेत. म्हणूनच मुख्यमंत्र्यांची ओळख अनाथांचा नाथ एकनाथ अशी राज्यभर होत आहे. कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटी, रंकाळा तलावासाठी 15 कोटी, राजर्षी शाहू समाधी स्थळासाठी 10 कोटी, कन्हवेंशन सेंटरसाठी 100 कोटींचा निधी दिला आहे. यापूर्वीच्या सरकारने योजना कागदावरच ठेवल्या. हे सरकार शासकीय योजना थेट लोकांच्या दारात आणला आहेत.
खासदार माने म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेच्या दारापर्यंत शासकीय योजना पोहोचविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शासन आपल्या दारीमुळे तळगळातील नागरीकापर्यंत उभारी देण्याचे काम हे सरकार करत आहे.
माजी आमदार हाळवणकर यांनी राज्यात यापूर्वी हेल्पाटे मारल्याशिवाय शासकीय कामे होत नव्हती. परंतू शिंदे-फडणवीस सरकारच्या शासन आपल्या दारी उपक्रमामुळे प्रशासन गतीमान झाल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाने शासकीय योजना घरोघरी जावून माहिती दिली. 75 हजाराचे उद्दिष्टे असताना 1 लाख 58 हजार लाभार्थी केले आहेत. त्यामुळे यावर्षीसाठी पुढील उद्दीष्ट राज्य सरकारने जिह्याला द्यावे. ते उद्दीष्टही पूर्ण कऊ. मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेमुळेच हा कार्यक्रम घेऊन तो पूर्ण कऊ शकलो.
यावेळी खासदार मंडलिक, अमोल शिंदे, अमित हुक्कीरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. संजयसिंह चव्हाण यांनी आभार मानले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, रवींद्र चव्हाण, राजेखान जमादार, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, अॅङ वीरेंदसिंह मंडलिक यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परकिय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर
गेल्या अकरा महिन्यात महाराष्ट्रात 1 लाख 14 हजार कोटींची परकिय गुंतवणूक होऊन महाराष्ट्र देशात क्रमांक पहिल्या क्रमांकावर आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरात व कर्नाटक आघाडीवर होते. परंतु आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर आल्याचा सार्थ अभिमान वाटत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.









