आ . राणेंच्या उपस्थितीत केला प्रवेश
देवगड/ प्रतिनिधी
आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उ.बा.ठा शिवसेना पक्षाच्या शिरगांव ग्रामपंचायत सदस्य शीतल तावडे यांच्यासह गुरुनाथ तावडे, प्राची तावडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुका अध्यक्ष राजू शेटये, युवक सेलचे तालुकाध्यक्ष अमित साटम आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. या भागाचा विकास करण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी लाखो रुपयांचा निधी आणला आहे. या भागाचा विकास आमदार नितेश राणे हे करू शकतात. हे लक्षात आल्याने आपण भाजपामध्ये आल्याचे शीतल तावडे यांनी सांगितले.









