अमेझॉन प्राइम व्हिडिओची गाजलेली सीरिज
अमेझॉन प्राइम व्हिडिओची विनोदी धाटणीची वेबसीरिज पंचायतचा सीझन 2 चालू महिन्यात स्ट्रीम होणार आहे. पंचायत 2 सीरिज 20 मे रोजी पासून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. पोस्टरमध्ये पहिल्या सीझनचा नायक दीपक त्रिपाठी एका स्टुलवर बसलेला आणि अत्यंत त्रस्त दिसून येतोय. तसेच त्याच्या भोवताली अनेक फाइल्स दिसून येत आहेत. पंचायत यांच्या या सीझनची प्रदर्शनाची तारीख घोषित करत अमेझॉन प्राइम व्हिडिओने ‘जनहित में जारी अब आ रही है फिर से, पंचायत देखने की बारी’ असे नमूद केले आहे.

या सीरिजचा पहिला सीझन 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि तेव्हापासून लोकांना याच्या पुढील सीझनची प्रतीक्षा होती. पंचायत वेबसीरिजची कहाणी एक इंजिनियरिंग पदवीधर अभिषेक मिश्रा या व्यक्तिरेखेच्या भोवती घुटमळणारी आहे. जितेंद्र कुमार, रघुवीर यादव, नीना गुप्ता हे कलाकार असलेल्या या लोकप्रिया कॉमेडी ड्रामा वेबसीरिजचे दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे.









