प्रतिनिधी/ पणजी
राज्याच्या क्रांतिदिनाचा प्रमुख सोहळा आज दि. 18 जून रोजी राजधानीत आझाद मैदानावर होणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची त्यावेळी उपस्थिती असेल.
सकाळी 8.45 वाजता मान्यवरांचे आझाद मैदानावर आगमन होईल. त्यानंतर विविध स्वातंत्र्यसैनिक आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि राज्यपाल हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली वाहतील.
सर्व गोमंतकीयांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









