पणजी : राजभवन येथे आज बुधवारी होणाऱ्या विशेष समारंभात देशातील आठ राज्यांचा आणि पाच केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिन साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाला माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू उपस्थित राहणार आहेत. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब, तामिळनाडू या राज्यांबरोबरच अंदमान व निकोबार बेट समूह, चंडिगड, दिल्ली, लक्षद्वीप, आणि पु•gच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिन आज दि. 1 नोव्हेंबर रोजी आहे. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेंतर्गत गोव्यातही या आठ राज्ये आणि पाच केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिन साजरा केला जाईल. कार्यक्रम राजभवन येथे दुपारी 3.30 ते सायंकाळी 5.30 या दरम्यान होईल.









