सगळीच कामे गेले अनेक महिने रखडूनच : जूनपर्यंत कामे पूर्ण होण्याची शक्यता कमीच,मंत्री नीलेश काब्राल यांनीही केले हात वर
पणजी : स्मार्ट सिटीची कामे आणि मलनिस्सारणासाठी नव्याने घातलेल्या वाहिन्यांची कामे एकाच वेळी हाती घेऊन ती कामे गेले अनेक महिने रखडत आहेत. अशा परिस्थितीत अचानकपणे पाऊस पडला तर पणजीत सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरणार असून त्याचबरोबर अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता वाढली आहे. तथापि, पणजी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी देखील या प्रकरणी हात वर केले आहेत. पणजीतील बहुतांश रस्ते एकाचवेळी खोदण्यात आले. गेले पाच महिने पणजीकरांचे अक्षरश: हाल झाले. सांत ईनेजचा रस्ता तर गेली दोन वर्षे बंदच आहे. ज्या सांत ईनेज भागातील अर्धा रस्ता चालू आहे त्या रस्त्यावर चर खोदून ठेवलेले आहेत.
ख•sमय, चिखलमय सांत ईनेज
येत्या 1 जूनपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता कमीच असल्याने सांत ईनेज भागातील नागरिकांचे ऐन पावसाळ्dयात फार हाल होणार आहेत. सांत ईनेज रस्त्यावर सध्या खोदून माती टाकल्याने सर्वत्र चिखलमय व ख•sमय अशी स्थिती झालेली असून दुचाकी वाहने तिथे नेता येत नाही. वाहने नेणाऱ्यांना फार मोठी कसरत करावी लागत आहे. चारचाकी वाहनांना तर दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा संपूर्ण रस्ता खराब झालेला असून जोरदार पाऊस पडला तर सांत ईनेज भागातील नागरिकांचे फार मोठे हाल होणार आहेत.
नव्याने केलेली कामे निकृष्ट दर्जाची
पणजीत अनेक गटारे फोडून नव्याने बांधण्यात आलेली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांना नव्याने हॉटमिक्सींग केले आहे, परंतु मूळ रस्ता खरोखरच मजबूत आहे की नाही याची पाहणी वा चाचपणी केलेली नाही. त्यामुळे नव्याने हॉटमिक्स डांबरीकरण केलेले रस्ते देखील वाहून जातील, अशी परिस्थिती आहे. त्याचबरोबर मलनिस्सारणसाठी जिथे रस्ते खोदले आणि जिथे नव्याने मोऱ्या बांधल्या त्यांचे कामही दर्जेदार नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे ख•s पडून वाहने आत ऊतून बसण्याचीच भीती आहे. सध्याच अनेक ठिकाणी वाहने ख•dयांमध्ये रुतून पडत आहेत, त्यामुळे पावसाळ्यात काय परिस्थिती होईल, हे सांगता येत नाही.
गटारांमध्ये माती, चिखल भरल्याने धोका
पणजीतील काही बांधकामे ही अत्यंत घाईघाईने केलेली आहेत. मातीचे ढिगारे हलविताना इतरत्र पडलेली माती, गटारात गेलेली माती वर काढण्यात आलेली नाही. काही मोजक्याच ठिकाणी गटारांवरील लाद्या उघडण्यात आल्या. पण हे काम सर्वत्र झालेले नाही. बहुतेक गटारांमध्ये माती, चिखल गेलेला आहे. त्यामुळे पणजी यंदा तुंबणार हे नक्की आहे.
पणजीकरांवर सध्या पावसाची कृपा
सध्या महापौर रोहीत मोन्सेरात व पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांचे सुदैव म्हणजे निसर्गाने त्यांना साथ दिली आहे. गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा वारंवार देण्यात आला होता. मात्र ढग एकतर सावंतवाडीकडे किंवा कारवारच्या दिशेने गेले असावे. गोव्याच्या शेजारी बेळगावसह सर्वत्र मुसळधार पाऊस पडला. गोव्यात मात्र परवा वास्को, मडगाव, काणकोण इत्यादी ठिकाणी पडलेला पाऊस वगळता पाऊस पणजीवर ऊसून बसलेला असावा. दरवर्षी एव्हाना सात ते आठ वेळा तरी मुसळधार पाऊस पडून जायचा. यंदा एकदाही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पणजीचे जे काय होईल ते जूनमध्ये पाऊस झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल.
मंत्री काब्राल, महापौर मोन्सेरात यांच्याकडून हात वर
सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी काल सोमवारी पणजीचे महापौर रोहित बाबुश मोन्सेरात यांच्याबरोबर काही भागांचा दौरा कऊन पाहणी केली. आमच्यापरिने आम्ही काम करीत आहोत. स्मार्टसिटीवाल्यांनी नेमके काय केलेय याची आपल्यालाही कल्पना नाही. पणजी तुंबणार की नाही याबाबत आपण काही ग्वाही देऊ शकत नाही, असे म्हणून मंत्री व महापौरांनी देखील हात वर केले.









