गुहागर: गुहागर तालुक्यात रात्रीपासून कोसळणाऱ्या दमदार पावसाने शृंगारतळी बाजारपेठेबरोबर गुहागर व आरे येथील मुख्य मार्गावर पाणी भरले होते. शृंगारतळी बाजारपेठ व शहरातील एस. टी. स्टँड येथील गटारांमधून निचरा न झाल्याने रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत मोठया प्रमाणावर पाणी रस्त्यावर आले होते.
तालुक्यात रविवारी पहाटेपासूनच पावसाने जोर धरला. या पावसामुळे शृंगारतळी बाजारपेठ जलमय झाली होती. राष्ट्रीय महामार्गाने रस्त्याचे केलेल्या कामामध्ये अजूनही गटारांचे काम अर्धवट आहे. परिणामी बाजारपेठेतील ग्लोब इलेक्ट्रीकल्स दुकानामध्ये तसेच अमरनाथ मोहीते यांच्या दुकानाबरोबर घरामध्येही पाणी शिरले. वेळीच खबरदारी घेतल्याने मोठे नुकसान झाले नाही.
पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना या महामार्गावरील असलेल्या सलग्न रस्त्याच्या मोरींची कामे करण्यात यावीत. गटारामध्ये पाणी जाण्यासाठी ठेवलेले मार्ग व्यवस्थीत करावीत. असा पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु याकडे राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. असे येथील सरपंच संजय पवार यांनी ‘तरूण भारत’जवळ बोलताना सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









