वृत्तसंस्था / म्युनिच
जर्मनीचा 17 वर्षीय टेनिसपटू दियागो डेडुरा पालोमेरोने येथे झालेल्या एटीपी टूरवरील म्युनिच बीएमडब्ल्यु पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीतील सामना जिंकला. एटीपी टूवरील या स्पर्धेत विजय मिळविणारा पालोमेरो हा सर्वात कमी वयाचा टेनिसपटू ठरला आहे.
2008 साली जन्मलेल्या जर्मनीच्या पालोमेरोने म्युनिचमधील या स्पर्धेत पहिल्या फेरीच्या सामन्यात कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हवर विजय मिळविला. या सामन्यात दुखापतीमुळे शेपोव्हॅलोव्हने दुसरा सेट्स सुरू असताना माघार घेतली. पालोमेरोने हा सामना 7-6 (7-2), 3-0 असा जिंकून पुढील फेरी गाठली. एटीपी टूवरील स्पर्धेत कमी वयात विजय मिळविणारा 17 वर्षीय पालोमेरो हा पहिला टेनिसपटू ठरला आहे. यापूर्वी म्हणजे 1984 साली जर्मनीच्या बेरीस बेकरने आपल्या वयाच्या 16 व्या वर्षी म्युनिच स्पर्धा जिंकली होती तर 1991 साली रुमानियाच्या डीनु पिसेरुने अमेरिकेच्या जॉन मॅकेन्रोचा पराभव केला होता. आता पालोमेरोचा दुसऱ्या फेरीतील सामना बर्जेसबरोबर होणार आहे.
या स्पर्धेतील अन्य सामन्यात मॅरिनो नेव्होनीने अॅलिसीमेचा 2-6, 6-4, 7-6 (7-3), चौथ्या मानांकीत हंबर्टने झेकच्या जेरीचा 4-6, 6-3, 6-2, पाचव्या मानांकीत सेरुनडोलोने स्ट्रफचा 6-0, 6-2, जर्मनीच्या वाईल्डकार्डधारक हेनीफमनने मेन्सीकचा 7-6 (7-4), 4-6, 6-3 असा पराभव करीत पुढील फेरीत स्थान मिळविले.









