हजारो भक्तांचा पालखी सोहळ्यात सहभाग
बेळगाव : समादेवी गल्ली येथील वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळातर्फे समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सोमवारी पालखी नगर प्रदक्षिणा घालण्यात आली. सोमवारी सकाळी महाअभिषेक, चौघडा, काकड आरती करण्यात आली. त्यानंतर अध्यक्ष दत्ता कणबर्गी, विश्वस्त मोहन नाकाडी, महादेव गावडे, मोतिचंद दोरकाडी, सचिव अमित कुडतूरकर आदींच्या हस्ते महाआरती करण्यात आली. दुपारी महानैवेद्य दाखविण्यात आला. समादेवी महिलावर्गांनी ओटी भरण्याचा कार्यक्रम केला. सायंकाळी पुराण वाचल्यानंतर श्रींच्या पालखींना प्रारंभ झाला. समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली, नार्वेकर गल्लीमार्गे समादेवी मंदिर येथे सांगता झाली. यावेळी हजारो भक्तांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. मंगळवार दि. 11 रोजी 12 वाजता महाप्रसादाला प्रारंभ होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक समितीने केले आहे.









