मिरज :
मिरज येथील मोहरम मिरवणुकीत काही तरुणांनी पॅलेस्टीनी देशाचा झेंडा फडकावत शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ट्रॅक्टर चालकासह पाच जणांना ताब्यात घेतले. पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता संबंधीत मंडळाच्या तऊणांनी सरबत गाडीची मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये रोजम दस्तगीर मणेर, सलमान शहाबुद्दीन मणेर, निशाद निजाम सतारमेकर, मिनाज युनूस सतारमेकर आणि ट्रॅक्टर चालक शुभम मल्लाप्पा तवकरे (सर्व रा. मिरज) यांचा समावेश आहे.
मोहरम निमित्त रविवारी मिरजेत सरबत गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. यासाठी शुभम तवकरे याचा ट्रॅक्टर घेऊन एलईडी स्क्रीन लावल्या होत्या. मिरवणुकीदरम्यान, संशयीतांनी युध्दग्रस्त देश असलेल्या पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवला. याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी मिरवणूक स्थळी धांव घेऊन कारवाई केली.








