वृत्तसंस्था / कराची
पाकिस्तानच्या डावखुरा वेगवान गोलंदाज 31 वर्षीय उस्मान शिनवारीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा मंगळवारी केली. शिनवारीने पाक संघाकडून आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 6 वर्षांपूर्वी खेळला होता.
उस्मान शिनवारीने 2013 ते 2019 या कालावधीत क्रिकेटच्या विविध प्रकारात 34 सामन्यात पाकचे प्रतिनिधीत्व केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने मंगळवारी निवृत्तीची घोषणा केली पण तो आणखी काही दिवस लीग क्रिकेटमध्ये खेळणार असल्याचे वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. त्याने 1 कसोटी, 17 वनडे आणि 16 टी-20 सामन्यात पाकचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2013 च्या डिसेंबरमध्ये शिनवारीने दुबईत लंकाविरुद्धच्या सामन्यात आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तसेच त्याने 2017 च्या ऑक्टोबरमध्ये शारजा येथे झालेल्या लंकेविरुद्धच्या सामन्यात वनडे पदार्पण केले होते. 2019 साली लंकेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात त्याचा पाक संघात समावेश होता. त्याने वनडेमध्ये 34 तर टी-20 मध्ये 13 गडी बाद केले आहेत.









