ऑनलाईन टीम/तरुण भारत
पीएफआय (PFI) बंदीच्या विरोधात ट्वीट केल्या प्रकरणी पाकिस्तान सरकारचं ट्विटर अकाउंट भारतात बंद करण्यात आलं आहे. हे ट्विटर अकाउंट भारतीय ट्विटर युजर्ससाठी ब्लॉक करण्यात आलं आहे. अनेक तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं ट्विटरकडून सांगण्यात आलं आहे.
पीएफआय बंदीचा निषेध केल्याबद्दल पाकिस्तान सरकारचे अधिकृत टि्वटर हँडल भारतात बंद करण्यात आले आहे. तीन महिन्यांत दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली आहे. जुलै महिन्यातही पाकिस्तानी हँडलवर बंदी घालण्यात आली होती, परंतु त्यानंतर पुन्हा ते सुरू करण्यात आले. दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या कारणावरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर कॅनडास्थित पाकिस्तानी दूतावासाने त्याचा निषेध केला तसेच पीएफआयचे समर्थनही केले होते. त्यामुळे हे हँडल भारतात बंद करण्याची मागणी केली.
हे ही वाचा : दोन भारतीय मच्छीमार नौकेवरील १६ खलाशी पाकिस्तानच्या ताब्यात, ७ जण पालघरमधील