ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला मोठे नुकसान
भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा असा प्रभाव झाला आहे की एक आठवड्यानंतरही पाकिस्तानी सैनिक रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. या जखमी पाकिस्तानी सैनिकांवर उपचार सुरू आहेत. भारतीय वायुदलाच्या अचूक कारवाईमुळे केवळ दहशतवाद्यांचा खात्मा झाला नसून पाकिस्तानी सैन्याचे कंबरडे देखील मोडले आहे. भारताने प्रचंड दणका दिल्याने पाकिस्तानी सैन्याधिकारी आणि सैनिक अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत. पाकिस्तानी सैन्यप्रमुख आसिम मुनीर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी जखमी सैनिकांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयाचा दौरा केला आहे. पाकिस्तानी सैनिकांना धीर देताना मरियम दिसून आल्या. तर मुनीर देखील रावळपिंडीत सैन्य रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी जखमी सैनिकांची भेट घेतली. या घटनाची छायाचित्रे समोर आल्याने भारतीय सैन्याने अचूक रणनीतिद्वारे पाकिस्तानच्या सैन्यतळांना मोठे नुकसान पोहोचविल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच भारतीय कारवाईत मोठे नुकसान झाले नसल्याच्या पाकिस्तानच्या दाव्याची पोलखोल झाली आहे.









