न्यायालयात दाखल आरोपपत्रात एनआयएचा खुलासा
वृत्तसंस्था / चंदीगड
चंदीगडमधील सेक्टर 10, कोठी क्रमांक 575 येथे सप्टेंबर-2024 मध्ये झालेल्या हँडग्रेनेड स्फोटप्रकरणी एनआयएच्या तपास पथकाने विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानुसार या हँडग्रेनेड बॉम्बस्फोटाचा संबंध पाकिस्तानशी असल्याचे दिसून येते. एनआयएने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात पाकिस्तानस्थित हरविंदर सिंग रिंडा आणि अमेरिकेतील गँगस्टर हरप्रीत सिंग उर्फ हॅपी पासिया यांचे नाव देखील समाविष्ट केले आहे. त्यांच्या सूचनेवरून हा स्फोट घडवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 एप्रिल रोजी होईल. 10 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास एका ऑटोमधून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी कोठी क्रमांक 575 वर हातबॉम्ब फेकून स्फोट घडवून आणला होता.









