शस्त्रसंधी झाल्यावर सुरक्षित ठिकाणी पोहोचले जनरल असीम मुनीर
भारताच्या प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईदरम्यान पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल आसीम मुनीर यांना बंकरमध्ये लपावे लागले होते. 10 मे रोजी रावळपिंडीच्या नूर खान वायुतळावर भारताने जोरदार हवाई हल्ले केले होते. यादरम्यान जनरल मुनीर यांना दोन ते तीन तासांपर्यंत सुरक्षित बंकरमध्ये लपून रहावे लागले. तर शस्त्रसंधीनंतर आता त्यांना एका सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी होऊनही मुनीर हे समोर येत नसल्याचे चित्र आहे.
भारत आणि पाकिस्तान दरम्यान 4 दिवस (6-10 मे) जोरदार सैन्य संघर्ष दिसून आला. भारताकडून दहशतवादी अ•dयांना लक्ष्य करण्यात आल्यावर पाकिस्तानने भारतात ड्रोन्स हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर देत त्याच्या अनेक वायुतळांना लक्ष्य केले होते. यातील सर्वात महत्त्वपूर्ण रावळपिंडीच्या नूर खान वायुतळावरील हल्ला होता. याच तळावरील हल्ल्याने सैन्यप्रमुख असीम मुनीर भयभीत झाले होते.
पाकचे प्रचंड नुकसान पाकिस्तानसाठी नूर खान वायुतळ महत्त्वाचा
नूर खान वायुतळ पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात असून याला पाकिस्तानच्या सर्वात मजबुत सैन्यतळांपैकी एक मानले जाते. येथे पाकिस्तानची सर्वात शक्तिशाली हवाई उपकरणे तैनात असून त्यांच्या सुरक्षेसाठी चिनी हवाई सुरक्षा यंत्रणांचे जाळे देखील आहे. पाकिस्तानचे बहुतांश महनीय व्यक्ती येथूनच स्वत:चा विमान प्रवास सुरू करत असतात. येथे पाकिस्तानी वायुदलाच्या एअर मोबिलटी कमांडचे मुख्यालय देखील आहे. अशा स्थितीत येथे भारताने हल्ला केल्याने असीम मुनीर यांना बंकरमध्ये लपत स्वत:चा जीव वाचवावा लागला. मुनीर यांनाच जीव वाचविण्यासाठी बंकरमध्ये लपावे लागल्याने पाकिस्तानी सैन्याची फजिती झाली.









