वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यावर्षी भारतात होणाऱ्या आयसीसी महिला वनडे विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी पाकिस्तानाने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
ही पात्रता स्पर्धा पाकमध्येच 9 ते 19 एप्रिल या कालावधीत होणार आहे. 13 व्या वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्याकरिता सहा संघ प्रयत्न करीत आहेत. क्वालिफायर स्पर्धेसाठी पाकने 19 सदस्यीय प्राथमिक संघ शिबिरासाठी निवडला होता. अंतिम संघातून मात्र अष्टपैलू निदा दारला वगळण्यात आले आहे. मागील वर्षी आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत नेतृत्व केलेल्या अष्टपैलू फातिमा सनाकडेच या स्पर्धेचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. युवा खेळाडू शावाल झुल्फिकारचे राष्ट्रीय संघात 2023 नंतर पुनरागमन झाले आहे. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने होणार असून अव्वल दोन स्थान मिळविणारे संघ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.
पात्रता स्पर्धेसाठी निवडलेला पाक महिला संघ : फातिमा सना (कणर्धार), नजिहा अल्वी, गुल फिरोजा, सिद्रा आमीन, ओमायमा सोहेल, आलीया रियाझ, डायना बेग, सादीया इक्बाल, नशरा सुंधू, मुनीबा अली, रमीन शमीम, शावाल झुल्फिकार, सईदा आरूब शाह, नतालिया परवेझ, सिद्रा नवाज.









