वृत्तसंस्था/ लाहोर
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या द्विपक्षीय वनडे आणि आणि टी-20 मालिकांसाठी पीसीबीने पाक महिला क्रिकेट संघांची घोषणा केली आहे. पाक संघामध्ये डायना बेगचे पुनरागमन झाले आहे. शुक्रवारी पाक महिला निवड समिती क्रिकेट प्रमुख सलिम जाफरने ही घोषणा केली आहे.
उभय संघामध्ये तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. उभय संघातील टी-20 चे तीन सामने कराचीच्या नॅशनल बँक्स स्टेडियमवर 1 ते 5 सप्टेंबर दरम्यान तसेच त्यानंतर तीन वनडे सामने कराचीतील याच स्टेडियमवर 8, 11, 14 सप्टेंबरला होणार आहेत. निदा दारकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
पाक वनडे संघ : निदा दार (कर्णधार), अलिया रियाज, बिस्मा मारुफ, डायना बेग, फातिमा सना, गुलम फातिमा, मुनिबा अली, नेसरा सुंधु, ओमिमा सोहेल, शदाफ समास, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज, युमी हनी, वहीदा अख्तर.
पाक टी-20 संघ : निदा दार (कर्णधार), अलिया रियाज, बिस्मा मारुफ, डायना बेग, फातिमा सना, मुनिबा अली, नजिहा अल्वी, नेसरा सुंधु, नातालिया परवेझ, शदाफ समास, सादिया इक्बाल, शेवाल झुल्फिकार, सिद्रा अमीन, साईदा अरुब शहा, ओमेमी हनी.









