नसीम शहा सामनावीर, झमान, बाबर, रिझवान यांची अर्धशतके
वृत्तसंस्था/ कराची
सोमवारी येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात यजमान पाकने न्यूझीलंडचा 6 गडय़ांनी पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 57 धावा पाच बळी टिपणाऱया नसीम शहाला सामनावीराचा बहुमान मिळाला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी मिळाल्यावर न्यूझीलंडने 50 षटकात 9 बाद 255 धावा जमविल्या. पाकचा नसीम शहा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 57 धावात 5 गडी बाद केले. पाच बळी मिळविण्याची त्याची ही दुसरी वेळ आहे. त्यानंतर पाकने 48.1 षटकांत 4 बाद 258 धावा जमवित विजय साकार केला. पाकच्या डावात सलामीवीर फखर झमानने 74 चेडूत 56, कर्णधार बाबर आझमने 82 चेंडूत 66, मोहम्मद रिझवानने 86 चेंडूत नाबाद 77 धावांचे योगदान दिले. याशिवाय हॅरिस सोहेलने 23 चेंडूत 32, इमाम उल हकने 11, आगा सलमानने 10 चेंडूत नाबाद 13 धावा काढल्या. न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलने 44 धावांत 2, साऊदी व ग्लेन फिलिप्सने एकेक बळी मिळविले.
नसीम शहा प्रभावी
या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. पाकच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाले. न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक नोंदविता आले नाही. मिचेल ब्रेसवेलने 42 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 43, लॅथमने 52 चेंडूत 3 चौकारांसह 42, मिचेलने 55 चेंडूत 1 चौकारासह 36, फिलिप्सने 53 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 37, कर्णधार विल्यम्सनने 39 चेंडूत 3 चौकारांसह 26, सलामीच्या ऍलेनने 27 चेंडूत 6 चौकारांसह 29 तसेच सँटनरने 3 चौकारांसह 21 व टिम साऊदीने 1 चौकारासह नाबाद 15 धावा जमविल्या.
न्यूझीलंडच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. नसीम शहाच्या पहिल्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर सलामीचा फलंदाज कॉनवेचा त्रिफळा उडाला. पहिल्या 15 षटकात न्यूझीलंडची स्थिती 3 बाद 69 अशी होती. मिचेल आणि लॅथम यांनी चौथ्या गडय़ासाठी 56 धावांची भागीदारी केली. लॅथम पाचव्या गडय़ाच्या रूपात बाद झाल्यानंतर फिलिप्स आणि ब्रेसवेल यांनी सहाव्या गडय़ासाठी 66 धावांची भर घातल्याने न्यूझीलंडला 250 धावांचा टप्पा ओलांडता आला. न्यूझीलंडच्या डावात 2 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले. पाकच्या नसिम शहाने 57 धावात 5, उस्मा मिरने 42 धावात 2 तर मोहम्मद वासीम आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 50 षटकात 9 बाद 255 (ऍलेन 29, विल्यम्सन 26, मिचेल 36, लॅथम 42, फिलिप्स 37, ब्रेसवेल 43, सँटेनर 21, साऊदी नाबाद 15, नसिम शहा 5-57, उस्मा मिर 2-42, मोहम्मद वासीम 1-43, मोहम्मद नवाज 1-38).
पाक 48.1 षटकांत 4 बाद 258 (फखर झमान 56, बाबर आझम 66, रिझवान नाबाद 77, हॅरिस सोहेल 32, सलमान नाबाद 13, इमाम उल हक 11, ब्रेसवेल 2-44, साऊदी 1-55, फिलिप्स 1-35.










