वृत्तसंस्था/ कराची
आयसीसीतर्फे नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या वनडे सांघिक मानांकनात रविवारी पाकने ऑस्ट्रेलियाला पहिल्या स्थानावरुन खाली खेचत अग्रस्थान पटकावले. पाक संघाने नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत अफगाणचा 3-0 असा एकतर्फी पराभव केल्याने पाकने वनडे मानांकनात अग्रस्थानावर झेप घेतली.
अफगाणविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेपूर्वी वनडे मानांकनात ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानावर होता तर पाकचा संघ 115.8 रेटींग गुणासह दुसऱ्या स्थानावर होता. अफगाणबरोबरची मालिका एकतर्फी ज्ंिाकल्यानंतर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाक संघाने 118.48 मानांकन गुणासह पहिले स्थान मिळवले. 30 ऑगस्टपासून लंकेत होणारी 2023 सालातील आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आणि त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर दरम्यान भारतात होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचष्घ्क क्रिकेट स्पर्धेपूर्वी पाकने मानांकनातील अग्रस्थान मिळवल आहे. पीसीबीच्या व्यवस्थापन समितीचे प्रमुख झेका अश्रफ यांनी पाक संघाचे खास कौतुक केले आहे. कठोर परिश्रम आणि संघातील एकता यामुळेच पाकला हे यश मिळू शकले असेही त्यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षभराच्या कालावधीत क्रिकेटच्या वनडे प्रकारात पाक संघाची कामगिरी सातत्याने चांगली होत असल्याचे दिसून येते. या कालावधीत घरच्या भूमीवर विंडीजचा 3-0 तर त्यानंतर नेदरलँडसचा त्यांच्या भूमीवर 3-0 असा पराभव केला. 2023 च्या जानेवारीमध्ये पाकमध्ये झालेल्या वनडे मालिकेत पाकने न्यूझीलंडचा 2-1 असा पराभव केला होता. गेल्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत पाकने न्यूझीलंडचा 4-1 असा फडशा पाडला. त्याचप्रमाणे अफगाणविरुद्धची तीन सामन्यांची मालिकाही एकतर्फी जिंकली. लंकेत होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आता भारत आणि पाक हा सामना चुरशीचा होईल. तसेच शौकिनांना दर्जेदार खेळ पाहण्याची संधी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.









