वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
आगामी आशिया कप स्पर्धेसाठी आणि अफगाणिस्तान विरुद्ध वनडे मालिकेसाठी पीसीबीने पाकिस्तान क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. बुधवारी पीसीबीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, आशिया कपआधी पाकिस्तान अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी पीसीबीने 18 खेळाडूंचा टीममध्ये समावेश केला आहे. तर आशिया कपसाठी 17 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. अनुभवी बाबर आझमकडे नेतृत्वाची धुरा कायम ठेवण्यात आली असून तब्बल दोन वर्षांनंतर फहीम अश्रफचे संघात कमबॅक झाले आहे. शादाब खानकडे उपकर्णधारपदाची धुरा असून फखर झमान, इमाम-उल-हक, नसीम शाह यांचीही संघात वर्णी लागली आहे.
पाकिस्तान टीम – बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर झमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील (फक्त अफगाणिस्तान मालिकेसाठी), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.









