वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तानचा कसोटी कर्णधार शान मसूदकडील करार गुऊवारी त्याच्या नेतृत्वाखालील संघ ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेसाठी रवाना झाल्यानंतर काही तासांतच देशाच्या क्रिकेट मंडळाने पूर्वीच्या ‘डी’वरून ‘बी’ श्रेणीमध्ये सुधारित केला. 34 वर्षीय मसूदला 15 नोव्हेंबर रोजी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या समाप्तीपर्यंत कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर बाबर आझम पदावरून पायउतार झाल्याने नवा कर्णधार नियुक्त करावा लागलेला आहे.
पीसीबीने एका निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय करार यादीत पाकिस्तानचा कसोटी कर्णधार शान मसूदची श्रेणी ‘डी’वरून ‘बी’ अशी सुधारित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. केंद्रीय करार व्यवस्थेत ‘ए’ किंवा ‘बी’ श्रेणीच्या खाली असलेल्या खेळाडूला कर्णधार म्हणून नियुक्त केल्यास त्याच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात त्याच्याकडील कराराची श्रेणी सुधारून ‘बी’ अशी करायची असे मंडळाचे धोरण असून त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या डावखुऱ्या फलंदाजाने 30 कसोटी सामन्यांमध्ये 1,597 धावा केल्या आहेत. बुधवारी रात्री पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 14 डिसेंबरपासून पर्थमधून सुऊवात होणार आहे. हा संघ कॅनबेरा येथे 6 ते 9 डिसेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियन पीएम इलेव्हनविऊद्ध सामना खेळणार आहे.









