ऑनलाईन टीम/तरुण भारत
Pakistani military helicopter crashes in Balochistan : पाकिस्तान (Pakistan) चे लष्करी हेलिकॉप्टर रविवारी रात्री उशिरा देशाच्या नैऋत्य भागात कोसळले यामध्ये दोन अधिकाऱ्यांसह सर्व सहा सैनिक ठार झाले आहेत, असे लष्कराने सोमवारी सांगितले. दरम्यान, बलुचिस्तान प्रांतातील हरनाईजवळ हेलिकॉप्टर उड्डाण मोहिमेदरम्यान कोसळले, असे लष्कराच्या जनसंपर्क विभागाने एका निवेदनात म्हटले आहे. अपघाताचे कोणतेही कारण अद्याप समजलेले नाही.
गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत बलूचिस्तानमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटना होण्याची ही दुसरी घटना आहे. या पूर्वी ऑगस्ट महिन्यात अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी या हल्ल्याची जबाबदारी ही बलूचिस्तान लिब्रेशन संघटनेने घेतली होती. त्यामुळे या दुर्घटनेमागे देखील बलुचिस्थान लिब्रेशन संघटनेचा हात असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या हेलिकॉप्टर दुर्घटनेमागे देखील बलुच लिब्रेशन संघटनेचा हात असल्याचे बोलले जात आहे. सध्या पाक सेनेने कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास टाळले आहे. या घटनेची चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली जाणार आहे. पाक लष्कराने म्हटले आहे की, इंजीनियर्स यांनी केलेल्या तपासानंतर या आपघता मागचे कारण समजणार आहे. पाकिस्तानचे विरोधी पक्षनेता फवाद चौधरी या अपघाता बद्दल म्हणाले, पाक लष्करातील हेलिकॉप्टचे उड्डाण हे धोकादायक होत आहेत. अभियंते आणि अधिकारी या अपघाताची चौकशी करणार आहेत. यानंतरच हेलिकॉप्टर मधील त्रुटींमुले अपघात झाला की हल्ल्यामुळे हा अपघात झाला हे कळू शकणार आहे. अपघातात ठार झालेले सर्व अधिकारी हे तरुण होते, यामुळे पाकिस्तान लष्कराचे मोठे नुकसान झाले आहे.